सटाण्यातून भरदिवसा दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

सटाणा :- शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, १६ मे रोजी रावळगाव नाका परिसरातून एक एच.एफ. डीलक्स मोटरसायकल भरदिवसा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. वसंत नामदेव सोनवणे (वय ३८, रा. स्वराज्य नगर, सटाणा) यांची काळया रंगाची एच.एफ. डीलक्स मोटरसायकल (क्रमांक MH 41 AY 2751) ही १६ मे रोजी संध्याकाळी ५:३० ते ६ च्या सुमारास रावळगाव नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने लंपास केली. चोरीला गेलेल्या या दुचाकीची किंमत साधारण ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच सोनवणे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी BNS कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार शशिकांत जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या