टोलनाक्यावर राडा! टोलच्या पैशांवरून झालेल्या वादात चालकाला लोखंडी पट्टीने मारहाण

इगतपुरी :- घोटी टोलनाक्यावर टोलच्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादात टोल कर्मचाऱ्यांनी पिकअप चालकाला आणि त्याच्या साथीदाराला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पट्टीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १८ मे रोजी दुपारी १:५६ वाजेच्या सुमारास फिर्यादी रोशन गजानन मोंढे (वय २३, रा. सातपूर, नाशिक) हे आपल्या पिकअप गाडीने साक्षीदार मुकेश सोनवणे यांच्यासह इगतपुरीच्या दिशेने जात होते. घोटी टोलनाक्यावरील लेन क्रमांक ३ वर आल्यावर टोल कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे टोलचे जास्तीचे पैसे मागितले.'पैसे जास्त का मागत आहात?'असा जाब विचारल्याने तेथील पांढरा टी-शर्ट घातलेल्या कर्मचाऱ्याचा राग अनावर झाला. लोखंडी पट्टीने केला हल्ला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.संबंधित कर्मचारी आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी फिर्यादी आणि साक्षीदाराला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी एका कर्मचाऱ्याने तेथे पडलेली लोखंडी पट्टी उचलून साक्षीदार मुकेश सोनवणे यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर जोरात प्रहार केला,ज्यामुळे ते जखमी झाले.
'परत नादी लागलात तर जिवंत सोडणार नाही'मारहाण केल्यानंतर आरोपींनी 'पुन्हा जर आमच्या नादी लागलात तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही',अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.याप्रकरणी रोशन मोंढे यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये अज्ञात चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नगरे आणि पाटील करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या