नाशिक :- भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे.या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद भर पावसात महाराष्ट्र- गुजरातच्या सीमेवरील ठाणापाडा गावात पोहोचले.एवढेच नव्हे,तर तेथे जाऊन त्यांनी दिव्यांग मतदार भाऊराव गुलाबराव मोरे, यांचे प्र- गणना पत्र भरून घेत उपस्थितांना प्रात्यक्षिक करून दाखविले.यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये,तहसीलदार रामजी राठोड,नायब तहसीलदार सुयोग वाघमारे,आदी उपस्थित होते.ठाणपाडा हे गाव महाराष्ट्र- गुजरातच्या सीमेवरील हातगड ग्रामपंचायतींतर्गत येते.तेथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी भेट दिली.तेथे त्यांनी विशेष मतदार यादी सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.तसेच एका दिव्यांग मतदार भाऊराव गुलाब मोरे,यांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून एन्युमरेशन फॉर्म (Enumeration Form) भरून घेणे,आवश्यक माहितीची पडताळणी करणे तसेच स्कॅनिंग व डिजिटलायझेशनची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष करून घेतली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी सांगितले की,मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे.त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यंनी कामकाज अचूक,पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करावे.दुर्गम व सीमावर्ती भागातील प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी व माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी दळवट येथील शासकीय आश्रमशाळेस भेट देऊन पाहणी केली.यावेळी कळवणच्या प्रकल्पाधिकारी डॉ.संख्ये, तहसीलदार रोहिदास वारुळे,आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी शैक्षणिक कामकाजाची माहिती घेतली.
0 टिप्पण्या