भरधाव कारच्या धडकेत ६४ वर्षीय पादचारी महिलेचा मृत्यू; चालक फरार


नाशिक: मुंबई-आग्रा हायवेवर भरधाव कारच्या धडकेत ६४ वर्षीय पादचारी महिलेचा मृत्यू; चालक फरार
नाशिक :- मुंबई-आग्रा महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या वृद्ध महिलेला जोराची धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.अपघात घडल्यानंतर कार चालक घटनेची माहिती न देता गाडीसह घटनास्थळावरून फरार झाला आहे.ही घटना वाडीवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.लेन बदलून दिली धडक
मिळालेल्या माहितीनुसार,मृत महिलेचे नाव तुळसाबाई पोपट उर्फ अहिलाजी वय ६४,रा.राजूरबहुला शिवार,ता.जि.नाशिक असे आहे. २४ मे रोजी दुपारच्या सुमारास तुळसाबाई या राजूरबहुला शिवारातील गांधी पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेने पायी चालल्या होत्या.त्याच वेळी मुंबईकडून नाशिकच्या दिशेने 'MH 05 DS 4034' क्रमांकाची कार अत्यंत भरधाव आणि निष्काळजीपणे येत होती. चालकाने अचानक आपल्या गाडीची लेन बदलली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या तुळसाबाई यांना समोरून जोरदार धडक दिली.चालक कारसह फरार
धडक इतकी भीषण होती की, तुळसाबाई यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना माहिती देण्याऐवजी चालक कारसह तिथून पळून गेला.
वाडीवरे पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी मृत महिलेचे नातेवाईक नारायण पोपट उर्फ अहिलाजी तालखे (वय ४६) यांनी वाडीवरे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा (BNS कलम २८१, १०५) आणि मोटार वाहन कायद्यानुसार (MV Act १८४, १३४/१७७) गुन्हा नोंदवला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या