(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- आगामी पावसाळ्यात नाशिककरांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा,यासाठी नाशिक महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे.नवीन नाशिक भागातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या 'एक्सलो चौक ते गरवारे चौक' या मार्गावरील मान्सूनपूर्व कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. ३१ मे २०२६ पूर्वी ही सर्व नियोजित कामे १०० टक्के पूर्ण करण्याचा ठाम निर्धार मनपा प्रशासनाने केला आहे.अडचणींवर मात करत कामांना गती देण्यात येत आहे.या मुख्य मार्गावर काम करताना प्रशासनासमोर अनेक मोठी आव्हाने होती.यामध्ये
रस्त्याखालील ओएफसी (OFC) व एमएनजीएल (MNGL) लाईन्स
वाहतुकीचा प्रचंड ताण
काही ठिकाणी असलेली जागेची मर्यादा लक्षात घेऊन,नागरिकांची वाहतूक पूर्णपणे बंद न करता,ती टप्प्याटप्प्याने सुरू ठेवून कामे केली जात आहेत.त्यामुळे काही काळ कामाचा वेग कमी झाला होता.मात्र,आता मनपाने अधिक मनुष्यबळ आणि नवीन यंत्रसामग्री लावून कामाचा वेग वाढवला आहे. कामांची सद्यस्थितीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांमध्ये उत्तम समन्वय साधला गेला आहे.ओएफसी (OFC) काम: २,९७५ मीटर (१००% पूर्ण),एमएनजीएल (MNGL) काम: १००% पूर्ण,पर्जन्य वाहिनी काम: २,८०० मीटर (पूर्ण) झाले आहे. या मोहिमेबाबत बोलताना नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या,"शहरात सध्या विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. पावसाळ्यात या कामांमुळे नागरिकांना कोणताही धोका किंवा वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.प्रशासनासाठी नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था या गोष्टी सर्वोच्च प्राधान्यावर आहेत."३१ मेपूर्वी ही सर्व कामे पूर्ण करून नाशिककरांना पावसाळ्यापूर्वी दर्जेदार आणि सक्षम सुविधा देण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.
0 टिप्पण्या