सटाण्यात जुन्या वादातून घरात घुसून महिलेला व मुलाला बेदम मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


सटाणा :- सटाणा शहरातील शिवाजी नगर भागात एका महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे घुसून, तिला व तिच्या अल्पवयीन मुलाला लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 'आमच्यावर केलेली केस मागे घे' असे म्हणत हा हल्ला करण्यात आला असून, याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय.?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन सोनवणे या आपल्या घरात असताना, आरोपींनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. "तू आमच्यावर केलेली केस मागे का घेत नाहीस?"असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.यावेळी आरोपी किरण दौलत आहिरे याने हातातील लाकडी काठीने फिर्यादीच्या डोक्यात,पाठीवर आणि कंबरेवर गंभीर प्रहार केले.मुलालाही दिली धक्काबुक्की
मारहाणीचा आवाज ऐकून फिर्यादीचा मुलगा आरुष आणि मुलगी अपर्णा तिथे आले असता,आरोपींनी आरुषलाही जोरात ढकलून दिले. यात तो खाली पडल्याने बेशुद्ध झाला होता.या प्रकारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी फिर्यादीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असून,तिथल्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरून या घटनेचे गांभीर्य समोर आले आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी चेतन वसंत सोनवणे, किरण दौलत आहिरे आणि कृष्णा किरण आहिरे (सर्व राहणार सटाणा) यांच्याविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भदाणे करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या