दिंडोरी तालुक्यातील खुन प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
दिंडोरी :- तालुक्यातील खेडले येथील खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
दिनांक १३/०५/२०२६ रोजी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील मा. जिल्हा न्यायाधीश श्रीमती पांढरे मॅडम (कोर्ट क्र. २) यांच्या न्यायालयाने वणी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८३/२०२३, भारतीय दंड विधान (IPC) कलम ३०२, २०१, ३४ आणि भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये दाखल खटल्याची सुनावणी पूर्ण केली. या गुन्ह्यातील आरोपी किरण शरद कदम (वय २० वर्षे, रा. कोऱ्हाटे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) याच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने मा. न्यायालयाने आरोपीला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
१) भा.दं.वि. कलम ३०२ (खून) अंतर्गत: जन्मठेप आणि १०,०००/- रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद.
२) भा.दं.वि. कलम २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत: ३ वर्षे साधी कैद आणि २,०००/- रुपये दंड. दंड न भरल्यास १ महिना साधी कैद.
२) भा.दं.वि. कलम २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत: ३ वर्षे साधी कैद आणि २,०००/- रुपये दंड. दंड न भरल्यास १ महिना साधी कैद.
घटनेची पार्श्वभूमी:
ही घटना दिनांक ११/०९/२०२३ रोजी रात्री ०८:०० ते ११:०० वाजेच्या सुमारास खेडले गावी, फिर्यादीच्या राहत्या घराशेजारी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीने फिर्यादीचा मुलगा संदीप मेधणे याच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला.त्यानंतर त्याला घरातून बाहेर नेऊन,अज्ञात कारणावरून कोणत्यातरी हत्याराने बेदम मारहाण करून जीवे मारले.तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह कोणत्यातरी ज्वलनशील पदार्थाने जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास वणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांनी केला होता. त्यांनी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून मा.सत्र न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते.या खटल्यात सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) श्रीमती पेटकर यांनी काम पाहिले.तसेच पैरवी अंमलदार महिला पोलीस हवालदार (बकल नंबर ४५३) भोर आणि पोलीस शिपाई (बकल नंबर ६६४) विजय बेनके यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले,ज्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झाला.यासोबतच, गुन्हा दोषसिद्धी विभाग (Crime Conviction Cell) नाशिक येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक (Asst. PI) श्रीकांत पाटील आणि महिला पोलीस अंमलदार अश्विनी परदेशी यांनी हा गुन्हा शाबीत होण्यासाठी वेळोवेळी कायदेशीर मार्गदर्शन करून पाठपुरावा केला होता.
या गुन्ह्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिकचे पोलीस अधीक्षक (SP) डॉ. डी. एस.स्वामी आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तपास अधिकारी,पैरवी अंमलदार आणि दोषसिद्धी विभागातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष अभिनंंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा