कुंडाणे हनुमान मंदिरासमोरून मोटारसायकल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल


नाशिक :- कळवण तालुक्यातील कुंडाणे गावातील हनुमान मंदिरासमोरून एक मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तू हिरामण बहिरम (वय ४२, रा. दत्तनगर, ता. कळवण) यांनी आपली मोटारसायकल (क्रमांक MH 41 AR 9165, किंमत अंदाजे ३०,००० रुपये) कुंडाणे गावातील हनुमान मंदिरासमोरील एका झाडाखाली पार्क केली होती. दिनांक ३ मे २०२६ रोजी दुपारी २:०० ते ३:०० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने ही मोटारसायकल चोरून नेली.याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अभोणा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३१/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आभोणा पोलीस हवालदार (बक्कल नंबर २४६१) करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी