लासलगाव येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : समाज कल्याण विभागांतर्गत निफाड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन वसतिगृहांचे गृहपाल एन. व्ही. मेधणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलगाव साठी अनु.जाती प्रवर्गासाठी शालेय रिक्त 2 जागा, वरीष्ठ महाविद्यालय रिक्त 2 जागा आहेत. अनु.जमाती प्रवर्गासाठी शाले रिक्त 1 जागा, वरीष्ठ महाविद्यालय रिक्त 1 जागा आहे. इमाव/ आ.मा.दृ. प्रवर्गासाठी वरिष्ठ महाविद्यालय रिक्त 1 जागा व विमाप्र प्रवर्गासाठी वरीष्ठ महाविद्यालय रिक्त 1 जागा, अशा एकूण 8 रिक्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. दिव्यांग व अनाथ यांच्यासाठी प्रत्येक प्रवर्गात समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे.

वसतीगृहात विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे भोजन, दर महिना रूपये 1 हजार निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्कम, छत्री व गमबुट रक्कम, शैक्षणिक सहल रक्कम इत्यादी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी 02550- 267018 या दूरध्वनीवर व 8999391237, 8975277018 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा,असेही गृहपाल मेधणे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी