सटाणा-मालेगाव रोडवर भीषण अपघात; दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी,अज्ञात चालक फरार


सटाणा :- सटाणा-मालेगाव रस्त्यावरील लखमापूर गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने पुढून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून धडक देणारा चालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील नया इस्लामपुरा भागातील रहिवासी एजाज अब्दुल रहमान (वय २७) हे आपल्या मावशी खैरून्निसा मोहम्मद सुलतान यांच्यासह सटाणा येथे नातेवाईकांचा कार्यक्रम आटोपून आपल्या दुचाकीने (क्र. MH-41-AC-6084) मालेगावकडे परतत होते.दिनांक २ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास लखमापूर गावाजवळील शुभमंगल कार्यालयासमोर ते आले असता,पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने (क्र. MH-41-AC-4153) अत्यंत भरधाव वेगाने आणि हयगयीने वाहन चालवत फिर्यादीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.दोघे गंभीर जखमीया अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की,फिर्यादी एजाज यांच्या उजव्या हाताला व पायाला मोठी दुखापत झाली आहे. तर त्यांच्या मावशी खैरून्निसा यांच्या खांद्याला आणि छातीला मार लागल्याने त्या  जखमी झाल्या आहेत.अपघात घडल्यानंतर आरोपी चालक जखमींना कोणतीही मदत न करता किंवा अपघाताची माहिती न देता दुचाकीसह तेथून पसार झाला.याप्रकरणी एजाज अब्दुल रहमान यांनी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५ (a), १२५ (b) सह मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खांडेकर (ब.नं. ८६८) हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी