आमदार देवयानी फरांदे यांचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरीकांना आवाहन

नाशिक :- मुसळधार पाऊस अतिवृष्टी मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांशी नाशिक मध्य आमदार देवयानी फरांदे,यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संवाद साधला आहे.देवयानी फरांदे यांनी नाशिक सह गंगापूर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.असल्याने गगापूर धरणाची पाणीपातळी बाबत माहिती दिली आहे.यामध्ये गंगापूर धरण पाणीपातळी ५८% वरून ६३%, गौतमी धरण ८५%, तर कश्यपी धरण ४३% इतकी झाली आहे. असे कळवले असून सध्या गंगापूर धरणातून कोणताही पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही.गोदावरी नदीत वाहणारे सुमारे ९ हजार क्युसेक पाणी हे कॅचमेंट एरियामधून आलेले आहे. त्याचप्रमाणे नंदिनी नदीमध्येही कोणतेही पाणी सोडण्यात आलेले नसतानाही,कॅचमेंट परिसरातील पावसामुळे नदीला पूर आला आहे.९ हजार क्युसेक पाणी वाहत असतानाही जुन्या नाशिक परिसरात पाणी शिरलेले नाही. काही ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र महानगरपालिकेमार्फत त्या तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत.नंदिनी नदीच्या पुरामुळे भाभानगर व मिलिंद नगर परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे.या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून बाधित नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहनही प्रा,सौ,देवयानी फरांदे आमदार नाशिक मध्य यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या