महाराष्ट्र राज्यस्तरीय गो गेम प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न

नाशिक :- गो गेम असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय गो गेम प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ रविवारी (दि. ५ जुलै २०२६) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.हे प्रशिक्षण शिबिर दि. ३ ते ५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले होते.

समारोप समारंभास विभागीय उपअधिकारी योगेश मोरे,मुख्य प्रशिक्षक करण रावत,गो गेम असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक दुधारे,उपाध्यक्ष दीपक निकम,छत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंदे,गो गेम असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सचिव अविनाश वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून प्रशिक्षणासाठी सहभागी झालेल्या प्रशिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी गो गेम असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष अशोक दुधारे यांनी उपस्थित प्रशिक्षकांना संबोधित करताना आपल्या-आपल्या जिल्ह्यात गो गेमचा प्रचार व प्रसार करण्याचे तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अधिकाधिक खेळाडूंचा सहभाग नोंदविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे योगेश मोरे,यांनी गो गेमच्या विकासासाठी भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही देत प्रशिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.उपाध्यक्ष दीपक निकम,यांनी गो गेमच्या इतिहासाची माहिती देत महाराष्ट्रभर या खेळाच्या प्रसारासाठी असोसिएशन सर्वतोपरी सहकार्य करेल,असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल आहिरे,यांनी केले.उपस्थित मान्यवर,प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे समारोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सतिष बोरा,यांनी कार्यक्रमात आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या