237 थकीत कर वाहनांच्या ई-लिलावातून 83 लाख रूपयांचा महसूल प्राप्त




नाशिक :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षात ई लिलाव प्रणाली व एम.एस.टी.सी प्रणालीद्वारे एकूण 237 वाहनांचया लिलावातून एकूण रूपये 83 लाख 75 हजार 008 इतका महसूल वसूल करण्यात आला आहे,अशी माहिती नाशिक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षात 15 वर्षे पूर्ण झालेल्या शासनाची मालकी असलेल्या शासकीय वाहनांची तसेच कार्यालयामार्फत वेळोवेळी थकीत कर व पर्यावरण कर वसुलीकरिता तसचे विविध कारणास्तव जप्त करण्यात आलेल्या वाहनांची ई-लिलाव,एम.एस.टी.सी प्रणाली व आर.व्ही. एस.एफ लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली.यात ई लिलाव प्रक्रियेद्वारे 122 वाहनांना लिलावातून रूपये 35 लाख 181 इतका महसूल तर एम.एस.टी.सी प्रणालीद्वरे 115 वाहनांच्या लिलावातून रूपये 48 लाख 74 हजार 827 इतका महसूल वसुल करण्यात आला.असा एकूण 237 वाहनांच्या लिलावातून रूपये  83 लाख 75 हजार 008 इतका महसूल वसूल करण्यात आला आहे.

वाहन मालक/ परवाना धारकांनी आपल्याकडील वाहनांची शासकीय कर, कागदपत्रे अद्ययावत ठेवावाती तसेच थकीत करापोटी व इतर कारणास्त्व आपले वाहन अटकवून ठेवले असल्यास  त्याचे तडजोड शुल्क तत्काळ भरून वाहने सोडवून घ्यावीत,असे आवाहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती गुंड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी