कळवण :- चणकापूर येथील शासकीय आश्रमशाळा परिसरात आज ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने आयोजित मुख्य कार्यक्रमात कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी कश्मिरा संके, तहसीलदार वारुळे साहेब,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, आभोणा पोलीस ठाण्याच्या एपीआय कोकाटे मॅडम,तसेच समाजसेवक विजय चव्हाण (आभोणा),वामन चव्हाण,राजेंद्र पाटील, डी.एम.गायकवाड,अनिल घोडेस्वार,ज्ञानदेव पवार,आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने आमदार नितीन पवार,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण:
याप्रसंगी चणकापूर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत आश्रमशाळेच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी नृत्य सादर केले.त्यांच्या या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.
0 टिप्पण्या