छ.संभाजीनगर :-स्वातंत्र्यदिनानिमित्त लोहमार्ग पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस कर्मचारी संतोष उफाडे पाटील यांना जाहीर झालेले 'केंद्रीय उत्कृष्ट सेवा पदक' आज दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले.छत्रपती संभाजीनगरचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक (SP) संदीप पालवे यांच्या हस्ते संतोष उफाडे पाटील यांना हे पदक देऊन गौरविण्यात आले.पोलीस दलात बजावलेली उत्कृष्ट सेवा,कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन संतोष उफाडे पाटील यांना केंद्रीय उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले होते.आज १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांना हे पदक,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी संतोष उफाडे पाटील यांच्या कामगिरीचे कौतुक केले."लोहमार्ग पोलीस दलासाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.अशा पुरस्कारांमुळे इतर पोलीस अंमलदारांनाही उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा मिळते,"असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या सोहळ्याला लोहमार्ग पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी,पोलीस कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पदक स्वीकारल्यानंतर संतोष उफाडे पाटील यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या