वडाळा विविध कार्यकारी सोसायटी येथे स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

वडाळा :-भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या८० व्या वर्धापन दिनानिमित्त वडाळागाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था येथे ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात संपन्न झाला.याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्रीकृष्ण दादा खोडे,यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीताच्या सुरांमध्ये तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी सोसायटीचे चेअरमन ॲड.दत्तोपंत काश्मिरे,व्हाईस चेअरमन संगीता विधाते,सचिव उमेश कोल्हे,माजी नगरसेवक गंगाधर खोडे,अंबादास खोडे,शंकर खोडे,दिनकर खोडे,अर्जुन विधाते,प्रकाश खोडे,सुरेश विधाते,सुरेश खोडे,सुनील खोडे,अनिल खोडे,रमेश शिरसाठ,उषा साळवे,यशवंत साळवे,सुधीर तपासे,यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक,तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या