मविप्रचा‘समाज दिन’शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि साहित्यिक डॉ. पाटणे यांची मुख्य उपस्थिती



(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या वतीने कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त तसेच मविप्र संस्थेच्या आद्य संस्थापकांच्या गौरवार्थ ‘समाजदिन सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह येथे हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास शालेय शिक्षणमंत्री आमदार दादाजी भुसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते डॉ. यशवंत पाटणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याचे स्मरण तसेच मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या आद्य संस्थापकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मविप्र संस्थेच्या प्रदीर्घ शैक्षणिक व सामाजिक वाटचालीचा गौरव करणारा हा विशेष सोहळा ठरणार आहे.मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वास मोरे,उपसभापती देवराम मोगल, आणि चिटणीस दिलीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मविप्र संस्थेच्या कार्यकारी मंडळातील पदाधिकारी,संचालक, महिला सदस्या तसेच सेवक सदस्य या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.संस्थेचे सभासद,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन मविप्र संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या