मविप्रच्या कार्यविस्ताराला शासनाचे बळ : सर्वोतोपरी सहकार्याची शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ग्वाही

‘मविप्र’तर्फे समाज दिन सोहळ्यात विविध पुरस्कार, गुणगौरव

नाशिक :- कर्मवीरांच्या त्यागातून आणि कष्टातून उभी राहिलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेने नेहमीच विद्यार्थीहित जोपासले आहे.हाच विचार समोर ठेऊन आधुनिक सुविधा असलेले स्पर्धा परीक्षा केंद्र,विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,या हेतूने क्रीडा प्रबोधिनी स्थापन करावी. संस्थेने आपले कार्यक्षेत्र आणखी वाढवावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.त्यासाठी शासनस्तरावरून आवश्यक ते सहकार्य आणि सर्वोतोपरी मदतदेखील केली जाईल,असे आश्वासनही त्यांनी दिले. 

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या वतीने कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त तसेच मविप्र संस्थेच्या आद्य संस्थापकांच्या गौरवार्थ आयोजित समाजदिन व गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह येथे बुधवारी (दि. १९) दुपारी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.अध्यक्षस्थानी मविप्रचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते डॉ. यशवंत पाटणे,उपमहापौर विलास शिंदे,मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,उपसभापती देवराम मोगल,चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड.संदीप गुळवे,ॲड. लक्ष्मण लांडगे,प्रवीण जाधव, नंदकुमार बनकर,ॲड.रमेश बच्छाव,डॉ सयाजीराव गायकवाड, डॉ प्रसाद सोनवणे,शिवाजी गडाख, विजय पगार,अमित बोरसे,महिला संचालक शालन सोनवणे,शोभा बोरस्ते,सेवक संचालक सी.डी. शिंदे,माजी अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे,अरविंद कारे,माणिकतात्या बोरस्ते,नानासाहेब बोरस्ते,प्रल्हाद गडाख,अंबादास बनकर, नानासाहेब महाले,प्रल्हाद गडाख, विजूनाना गडाख आदी मान्यवर उपस्थित होते. 

ॲड.नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडत कर्मवीरांनी लावलेले ज्ञानरूपी रोपटे फुलविण्यासाठी कार्यकारिणी प्रयत्नशील आहे.कर्मवीरांचा त्याग आणि समर्पणाची जाणीव ठेऊन आम्ही संस्थेप्रती कटीबद्ध आहोत, असे आश्वासन दिले.डॉ.सुनील ढिकले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना समाज दिन म्हणजे मविप्र समाजासाठी एकप्रकारे दिवाळीचा सण आहे.आज शिक्षणात भारत तिसऱ्या क्रमांकावर असून,मविप्रसारख्या संस्थांच्या योगदानामुळेच हे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात कर्मवीरांच्या स्मृतींना उजाळा देत संस्था प्रगतीचा आढावा मांडला. उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.चिटणीस दिलीप दळवी यांनी आभार मानले.शिक्षणाधिकारी शशिकांत मोगल यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. प्रा. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले.प्रमुख मान्यवर व कार्यकारी मंडळाच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण,गुणवंतांचा सत्कार तसेच, ‘मविप्र पत्रिका जागर मराठीचा’, ‘वारी विशेषांक’, ‘काव्यांजली काव्यसंग्रहा’चे प्रकाशन करण्यात आले.यावेळी सुमन महादू घोलप, यांनी संस्थेसाठी एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश दिला. 
मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी समाजगीत आणि पसायदान सादर केले.याप्रसंगी मविप्र संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सर्व संचालक, शिक्षणाधिकारी,महिला सदस्या तसेच सेवक सदस्य,संस्थेचे सभासद,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक आणि जिल्हाभरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बहुजन लेकरांचे सोनं करणारे परीस : प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे
प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले,कर्मवीरांनी शिक्षण तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले.बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे उघडून क्रांती केली. मविप्र संस्थेच्या स्थापना करणाऱ्या कर्मवीरांचे वर्णन एका वाक्यात करायचे झाल्यास‘बहुजन समाजातील लेकरांच्या आयुष्याचे सोने करणारे परीस’असे करता येईल.सत्यशोधक चळवळीतून संस्थेचा जन्म झाला.संस्था चालवितांना ऐक्याचे बळ महत्वाचे आहे. काळाच्या ओघात कर्मवीरांच्या कार्यकार्तुत्वातून आपण त्यांचे स्मरण करू शकतो. कर्मवीरांचे जीवन हा समाज शिक्षित करण्याचा ध्यास होता. शिक्षणाने आध्यात्मिक आणि बौद्धिक वाढ झाली पाहिजे. श्रम आणि शिक्षणाचा सांधा कुठेतरी बांधला गेला पाहिजे तरच कर्मवीरांचा जन्मदिवस हा जन्मोत्सव होईल,असे विचार त्यांनी मांडले.तसेच शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी 
1) चालू शैक्षणिक वर्षापासून सीबीएससीसह सर्व अभ्यासक्रमांमध्ये सर्व भाषांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास दोन पानांमध्ये समाविष्ट करणार
2) राज्यभर कोल्हापूर पॅटर्नसह विविध उपक्रम राबविणार
3) शैक्षणिक हिताच्या दृष्टीने शिक्षण विभागाला एसएमएसद्वारे आवश्यक सकारात्मक सूचनांचा विचार केला जाईल
4) मोबाइलचा अतिवापर टाळा, दररोज किमान एक ते दोन तास मोबाइल बंद ठेवा,कुटुंबातील मुलांशी,ज्येष्ठांशी संवाद वाढवा.असे आवाहन केले.

पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे 1) लोककला गजाभाऊ बेणी पुरस्कार (निलवसंत फाउंडेशनतर्फे डॉ.प्राची पवार यांच्याकडून) : प्रवीण जाधव, 2) द. गो. खैरनार गुरुजी ग्रंथालय पुरस्कार (गोदावरी बँकेतर्फे अमृता पवार यांच्याकडून) : वसंतराव मोराडे,3) मविप्र सर्वोत्कृष्ट कबड्डी खेळाडू पुरस्कार (ॲड.उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मविप्रतर्फे नववा पुरस्कार) : शिवकुमार बोरगुडे,4) मविप्र संस्थेतील उत्कृष्ट पुरुष व स्त्री खेळाडू पुष्पावती रौंदळ,करंडक (पुष्पावती तुकाराम रौंदळ व विजय तुकाराम रौंदळ, यांच्यातर्फे) : कृष्णा संतोष आंबेकर,रविना विजय गायकवाड (केटीएचएम महाविद्यालय) 5) एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण : शितल शंकर लांडगे (जनता विद्यालय,पारेगांव,चांदवड) 6) समाज दिन शालेय वक्तृत्व स्पर्धा : जान्हवी हरिदास अरिंगळे -प्रथम,पूर्वा विनायक आरोटे-द्वितीय,कोमल संताजी जोंधळे - तृतीय,राजश्री ज्ञानेश्वर भदाणे - उत्तेजनार्थ,वैष्णवी समाधान कापसे - उत्तेजनार्थ.यांचाही झाला गौरव
यावेळी टोकियो जपान येथे पार पडलेल्या नौकानयन स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक प्रा. हेमंत पाटील यांचा विशेष सन्मान,केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. सतीश देवणे,यांना आदर्श पुरस्कार,आदर्श मुख्याध्यापक संजय डेर्ले,मुख्याध्यापिका जयश्री देवरे,आदर्श उपक्रमशील मराठी शाळा मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी,आदर्श क्रीडाशिक्षिका पुरस्कार मंगल शिंदे, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार कृष्णा आंबेकर,व रविना गायकवाड,तसेच वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या