नाशिक :- जागतिक आदिवासी दिनानिमित्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,नाशिक कार्यालयात आज वीर आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्यपूर्ण कार्याचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले.आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी,स्वातंत्र्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी,त्यांच्या त्यागाचा आणि संघर्षाचा वारसा पुढे न्यावा,असा संदेश यावेळी देण्यात आला.आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणेचे आयुक्त निलेश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त किरण माळी,वरिष्ठ संशोधन अधिकारी रोहिणी कर्पे, हेमलता गव्हाणे,संशोधन अधिकारी हसनलाल मरकाम,नवनाथ जानगर तसेच समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे,परंपरांचे आणि गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संविधानिक हक्कांचे संरक्षण,सामाजिक न्याय आणि समान संधी यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका बजावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
0 टिप्पण्या