खो-खोच्या मैदानावर शाळांचा दमदार खेळ मनपा क्षेत्रातील संघांची विभागीय,नाशिक तालुक्यातील संघांची जिल्हास्तरासाठी निवड


जुने नाशिक :- स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या क्रीडाभावना,शिस्त व संघभावनेला चालना मिळावी या उद्देशाने क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा २०२६-२७ उत्साहात पार पडल्या. २० ते २५ ऑगस्टदरम्यान हिरावाडी येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या स्पर्धेत विविध शाळांतील खेळाडूंनी कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले.मनपा क्षेत्रातील १४ वर्षांखालील मुलींच्या गटात गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल,१७ वर्षांखालील मुलींच्या गटात गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल,तर १९ वर्षांखालील मुलींच्या गटात वाय. डी.बिटको गर्ल्स स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला.मुलांच्या गटात १४ वर्षांखालीलमध्ये छत्रपती माध्यमिक विद्यालय, मखमलाबाद प्रथम,तर के.बी.एच.विद्यालय, वडाळा द्वितीय ठरले.१७ वर्षांखालीलमध्ये नूतन विद्यालय, म्हसरूळ, तर १९ वर्षांखालीलमध्ये डी.डी.बिटको बॉईज हायस्कूलने बाजी मारली.या संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
नाशिक तालुक्यात १४ वर्षांखालील मुलींमध्ये यशोदा माता विद्यालय, १७ वर्षांखालीलमध्ये जि.प.आदर्श शाळा,लाडाची,तर १९ वर्षांखालीलमध्ये एस.व्ही.के.टी. देवळाली कॅम्प विजयी ठरले. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात यशोदा माता विद्यालय,गव्हलानी, तर १९ वर्षांखालीलमध्ये एस.व्ही. के.टी.देवळाली कॅम्पने प्रथम क्रमांक मिळविला.या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.अंतिम सामन्याचे उद्घाटन विश्वचषक खो-खो संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या रेश्मा राठोड, क्रीडा अधिकारी उत्तरा खानापुरे व नेहा सुरनार यांच्या हस्ते झाले. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा अधिकारी प्रीती कारवा,यांनी संयोजन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या