नाशिक - जिल्ह्यातील सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी समाधान शिबिर - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद



जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे कारगिल विजय दिवस साजरा
नाशिक,दि.२७ जुलै:-जिल्ह्यात आजी- माजी सैनिकांची संख्या मोठी आहे.या सैनिकांचे विविध प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या धर्तीवर समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येईल,अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी दिली.जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,नाशिक यांच्यावतीने मुलींचे सैनिकी प्रवेश पूर्व प्रशिक्षण केंद्रात कारगिल विजय दिनानिमित्त आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट.कर्नल विलास सोनवणे (निवृत्त),उद्योजक जी.एस.सावंत,आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांच्या हस्ते वीर योद्धा, वीरमाता,वीरपत्नी आदींचा सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,म्हणाले की,अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत भारतीय सैन्यदलाने सांघिक कामगिरीच्या जोरावर ५० दिवसांत कारगिल युद्ध जिंकले. त्यासाठी अनेक सैनिकांना बलिदान द्यावे लागले,तर काही जण कायमचे दिव्यांग झाले.अशा या सर्व वीरांना मानवंदना देतो.जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून प्रेरणास्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.माजी सैनिकांनी उद्योगाला प्राधान्य द्यावे.त्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.गेल्या जानेवारीमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित सूर्यकिरण एरो शोच्या माध्यमातून संकलित झालेला निधी सैनिक मदत निधीसाठी देण्यात आला.ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी सांगितले.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री सोनवणे म्हणाले की,२७ वर्षापूर्वी कारगिल युद्ध झाले.त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ऑपरेशन विजय असे या मोहिमेला नाव देण्यात आले.या युद्धात सैन्य दलाच्या विविध तुकड्या सहभागी झाल्या होत्या.अतिशय कठीण परिस्थितीत भारतीय सैन्याने हा विजय मिळविला.या युद्धात जिल्ह्यातील जवानाला सेना पदक मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.यावेळी तनुजा शिर्काळे, सौरव पगारे,यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आजी- माजी सैनिक, वीरमाता,वीरपत्नी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या