'डायल ११२' ठरली गेमचेंजर
त्र्यंबकेश्वर :-त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेगाव शिवारामध्ये २६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास एका बांधकाम साईटवर पडलेल्या धाडसी दरोड्याचा छडा लावण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले आहे. 'डायल ११२' प्रणालीच्या तत्परतेमुळे पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून तब्बल ११ दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत.त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तलवार-कुऱ्हाडीचा धाक दाखवून दरोडा
पोलीस अधीक्षक डॉ डि एस स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार,तळेगाव शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळील एका बांधकाम साईटवर १० ते १२ अज्ञात दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून प्रवेश केला.दरोडेखोरांनी तेथील साईट सुपरवायझर ज्ञानेश्वर सुळे,आणि साक्षीदारांना तलवार, कुऱ्हाड,लोखंडी रॉड,कटर आणि कोयता यांसारख्या घातक हत्यारांचा धाक दाखवला.जीवे मारण्याची धमकी देत त्यांना पळवून नेले आणि जबरदस्तीने त्यांच्याकडील मोबाईल फोन, साईटवरील ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक सबस्टेशनसाठी आणलेले 'SQMM कंडक्टर वायर'चे दोन ड्रम असा एकूण ११ लाख ११ हजार १० रुपयांचा मुद्देमाल लुटून फरार झाले होते.
'डायल ११२' मुळे पोलिसांची तत्परता
घटना घडताच फिर्यादी यांनी तात्काळ 'डायल ११२' या पोलीस मदत क्रमांकावर कॉल करून माहिती दिली.माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक,दुय्यम अधिकारी आणि गस्तीवरील पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळाकडे धाव घेतली.पोलिसांनी सरकारी वाहनाने दरोडेखोरांच्या पळण्याच्या मार्गावर कसोशीने पाठलाग केला आणि सापळा रचून ११ आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) मनिष मदन सिंग (वय २१, रा. अंबड,नाशिक)
२) रोशन खंडु पाटील(वय ३०, रा. वाडीवऱ्हे, इगतपुरी)
३) योगेश कुमार सिताराम कुमार (वय ३४, रा. अंबड,नाशिक)
४) गणेश कैलास कातोरे (वय १९, रा. वाडीवऱ्हे, इगतपुरी)
५) अथर्व संजय सारुकते (वय १९, रा. वाडीवऱ्हे,इगतपुरी)
६) समाधान शिवाजी माळुंजकर (वय १८, रा. वाडीवऱ्हे,इगतपुरी)
७) पियुष अंबादास गवते (वय १८, रा. वाडीवऱ्हे, इगतपुरी)
८) कुणाल शरद चोथे(वय १९, रा. वाडीवऱ्हे, इगतपुरी)
९) शेखर जिवन अस्वले(वय १८, रा. वाडीवऱ्हे, इगतपुरी)
१०) अजय जिवन चोथे(वय १९, रा. वाडीवऱ्हे, इगतपुरी)
११) मनोज शांताराम मुर्तडक (वय २०, रा. वाडीवऱ्हे, इगतपुरी)

६.८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत; भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी दरोड्यात चोरलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, वायर,५ मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली लोखंडी कात्री, कुऱ्हाड,तलवार,कोयता,पक्कड, स्क्रूड्रायव्हर असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी संशयित आरोपींताविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(२) आणि ३४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी केली.पोलीस सध्या या गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल आणि इतर फरार आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
0 टिप्पण्या