इंदिरानगर येथे सालाबादप्रमाणे भव्य गुरुपौर्णिमा महोत्सव भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा

नाशिक,इंदिरानगर :इंदिरानगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात बुधवार,दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवानिमित्त सकाळी ८=३० वाजता सत्यदत्त महापूजा आयोजित करण्यात आली असून, या पूजेचे यजमान श्री.वेदांत सुहास बिडवई असतील.तसेच सायंकाळी ७=३० वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तकृपा सेवा समिती,चे दिलीप दत्तात्रय पाठक, तसेच नीलिमा गजानन उ-हेकर, परब नगर दत्त मंदिर,इंदिरानगर, नाशिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या