नाशिक ग्रामीण पोलीसांच्या कारवाईत जप्त केलेला लाखोंचा गांजा,अफू नष्ट

नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४२ लाख रुपयांचा गांजा आणि आफू खड्डा खोदून केला नष्ट!

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला सुमारे ४२ लाख १९ हजार ६०५ रुपये किमतीचा मुद्देमाल जाहीरपणे नष्ट केला आहे.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करत ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये तब्बल ७२५ किलो गांजा आणि ५० किलो आफूचा समावेश आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा घटकात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांतील मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश मा. सर्वोच्च न्यायालय (फौजदारी अपील नं. ६५२/२०१२),केंद्र सरकार आणि पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) यांच्या सूचनेनुसार देण्यात आले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा नोडल अधिकारी यांनी'अंमली पदार्थ केंद्रीय मुद्देमाल कक्ष,नाशिक ग्रामीण' येथील जप्त साठ्याचा आढावा घेतला.सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर हा प्रस्ताव'जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती'कडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता.समितीच्या मंजुरीनंतर ही कारवाई करण्यात आली.अशी झाली विल्हेवाट; व्हिडिओ शूटिंगही केले
दिनांक २३ जुलै २०२६ रोजी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस मुख्यालय,आडगाव येथील मोकळ्या जागेत ही प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये:सुका गांजा: ७२५.७६ किलो (किंमत रु. ३५,८४,५६५/-)आफू (Opium): ५०.०९ किलो (किंमत रु. ६,३५,०४०/-)एकूण मुद्देमाल: ४२,१९,६०५/- रुपये.हा सर्व साठा जिल्हास्तरीय समितीसमोर जाहीररीत्या खड्डा खोदून नष्ट करण्यात आला.ही विल्हेवाट लावताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली.तसेच पारदर्शकतेसाठी या संपूर्ण प्रक्रियेचे थेट व्हिडिओ चित्रीकरण (Video Recording) करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पडली
सदरची धडक कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ डि एस स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या विशेष समितीने केली.या वेळी अपर पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण),पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय),राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक,सहाय्यक रासायनिक विश्लेषक,न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे (FSL) वैज्ञानिक सहाय्यक,स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक आणि राखीव पोलीस निरीक्षक उपस्थित होते.पोलिसांच्या या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या