नाशिक :-आषाढी एकादशीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने भक्ती,श्रद्धा आणि कलेचा अनोखा संगम पाहायला मिळाला.इंदिरानगर,पाथर्डी रोड येथील रहिवासी व मायक्रो आर्टिस्ट ऐश्वर्या औसरकर यांनी चक्क जिऱ्याच्या एका दाण्यावर विठ्ठलाची सूक्ष्मचित्रकला साकारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.चष्मा न लावता अत्यंत बारकाईने, संयमाने आणि भक्तिभावाने साकारलेल्या या कलाकृतीत विठू माऊलीचे रूप जिऱ्याच्या दाण्यावर जिवंतपणे उतरवण्यात आले आहे.नुसत्या डोळ्यांनी ही कलाकृती पाहणेही कठीण,त्यासाठी मायक्रोस्कोपची गरज भासते."विठ्ठल भक्तीचा अनोखा आविष्कार"अशी ओळख असलेल्या या कलाकृतीचे कला रसिक आणि भाविकांकडून विशेष कौतुक होत आहे.लहानशा जिऱ्यावर मोठी श्रद्धा साकार करणाऱ्या ऐश्वर्या यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या