नाशिक - जिल्हाधकारी आयुष प्रसाद यांनी साधला पूरग्रस्त कुटुंबाशी संवाद

बालकलाकार गार्गी आहेरचेही केले कौतुक
नाशिक, दि 25 जुलै : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी आज दुपारी निफाड तालुक्यातील सायखेडा व चांदोरी परिसरास भेट देऊन पूरग्रस्त कुटुंबाशी संवाद साधला.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पाऊस झाला. यामुळे गोदावरी नदीला पूर आला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी आज दुपारी चांदोरी व सायखेडा परिसरास भेट देऊन पाहणी केली.यावेळी खासदार भास्कर भगरे,निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे,तहसीलदार विशाल नाईकवाडे,आदी उपस्थित होते.यादरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी सखे गं साजणी हा मराठी व्हिडिओ तयार करणाऱ्या गार्गी सागर आहेर या बाल कलाकाराची भेट घेऊन तिचे कौतुक केले.सध्या गार्गी एका दूरचित्रवाणी मालिकेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बालपणीची भूमिका साकारत आहे.यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी गार्गीच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कला,संस्कृती आणि सामाजिक भान यांचा समतोल साधत प्रगती करणाऱ्या नवोदित कलाकारांचे यश समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या