क्राक्रोज - पावसाळ्यात सगळीकडे झुरळांचा प्रादुर्भाव वाढला; आरोग्यासाठी धोक्याची घंटा



नवी दिल्ली :-देशभरात मान्सून सक्रिय झाल्यानंतर नागरिक उकाडा आणि उष्णतेपासून सुटकेचा आनंद घेत आहेत.मात्र,याच पावसाळी हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे (Humidity) देशातील घराघरांमध्ये झुरळांचा (Cockroaches) प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढल्याचे समोर आले आहे. शहरी भागांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत स्वयंपाकघर,मोरी आणि कपाटांच्या कोपऱ्यात झुरळांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे.
झुरळे हे केवळ कीटक नसून ते अनेक गंभीर आजारांचे वाहक आहेत.त्यांच्यामुळे घरात अन्नाद्वारे  टायफॉइड,डायरिया,फूड पॉयझनिंग (अन्नबाधा) आणि पोटाचे गंभीर विकार पसरण्याचा धोका असतो. झुरळांची विष्ठा आणि त्यांच्या अंगावरील सूक्ष्म जंतू हवेत मिसळल्याने लहान मुलांमध्ये अस्थमा (दमा) आणि अ‍ॅलर्जीचा त्रास वाढल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
घरगुती आणि सोपे प्रतिबंधात्मक उपाय:
आरोग्य तज्ज्ञ आणि कीटक नियंत्रण (Pest Control) तज्ज्ञांच्या मते, खालील सोप्या उपायांनी या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते:

कोरडेपणा ठेवा: झुरळे पाण्याच्या शोधात जास्त फिरतात.त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी किचन सिंक (Basin) आणि मोरी पूर्णपणे कोरडी ठेवावी
अन्न उघडे ठेवू नका: उरलेले अन्नपदार्थ किंवा कचरा कधीही उघडा ठेवू नका.कचऱ्याचा डबा नेहमी झाकलेला असावा.
नैसर्गिक उपाय:कडुनिंबाचे तेल, कापूर किंवा लिंबू आणि व्हिनेगरच्या पाण्याचा सराव केल्यास त्याच्या तीव्र वासाने झुरळे दूर राहतात
व्यावसायिक जेलचा वापर: प्रादुर्भाव जास्त असल्यास बाजारात मिळणारे अँटी-कॉकरोच जेल किंवा चॉक अत्यंत प्रभावी ठरतात.

पावसाळ्याच्या या दिवसांत घराची स्वच्छता आणि अन्नाची सुरक्षा राखणे हाच संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्याचा एकमेव प्रभावी मार्ग आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या