नाशिक :- नाशिक येथील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व,निवृत्त शिक्षक आणि श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट,नाशिकचे माजी अध्यक्ष कै.निवृत्ती फकीरा बोराडे,यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने समाज बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावर अत्यंत मोलाचे योगदान दिले होते.
त्यांच्या निधनाप्रीत्यर्थ समाज बांधव आणि आप्तेष्टांच्या वतीने विविध शोक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शोकसभा: कै. निवृत्ती बोराडे यांच्या स्मरणार्थ आज, रविवार दिनांक १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत 'श्री विश्वकर्मा मंदिर, सोमवार पेठ, नाशिक' येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दशक्रिया कार्यक्रम: त्यांचा उत्तरकार्य अर्थात दशक्रिया विधी कार्यक्रम शनिवार दिनांक २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता 'रामकुंड,गंगा घाट'(पाटीदार भवन जवळ),पंचवटी,नाशिक येथे पार पडणार आहे.या दुःखद प्रसंगी श्री विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट,नाशिक आणि समस्त विश्वस्त मंडळाने आपल्या भावना व्यक्त करत कै.निवृत्ती बोराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.प्रसिद्धी प्रमुख न्यूज च्या वतीने बोराडे, सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
0 टिप्पण्या