डेंग्यू,चिकुनगुनिया व मलेरिया प्रतिबंधासाठी मनपाकडून जनजागृती;नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांचे आवाहन


नाशिक :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य (मलेरिया) विभागाने नागरिकांना आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे आवाहन केले आहे.डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रसार एडीस एजिप्टाय या डासामार्फत होतो.हा डास घरातील तसेच परिसरातील सात दिवसांपेक्षा अधिक काळ साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतो.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात व परिसरात पाणी साचणार नाही याची नियमित काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.डेंग्यू प्रतिबंधासाठी महत्त्वाच्या सूचना आठवड्यातून एकदा घरातील सर्व पाण्याची भांडी,टाक्या व हौद स्वच्छ करून कोरडे करा.कुलर,फ्रिजचा ट्रे,फुलदाण्या आणि कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका.घराच्या परिसरातील जुने टायर,डबे,नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकचे कप यांची विल्हेवाट लावा.पाण्याच्या टाक्या कायम झाकून ठेवा.बांधकामस्थळे,बेसमेंट व गच्चीवर पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.अंगभर कपडे परिधान करा आणि आवश्यक असल्यास डासप्रतिबंधक क्रीम किंवा जाळीचा वापर करा.ताप,अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे किंवा अंगावर पुरळ आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.स्वतःहून औषधोपचार करू नका; विशेषतः डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेणे टाळा.डासांची उत्पत्ती आढळल्यास किंवा धूर फवारणीची आवश्यकता असल्यास मनपाशी संपर्क साधा.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध भागांमध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी,धूर फवारणी तसेच गप्पी मासे उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू असून, यासाठी विभागनिहाय नियुक्त कर्मचाऱ्यांशी नागरिकांनी संपर्क साधावा. सार्वजनिक आरोग्य (मलेरिया) विभाग – विभागनिहाय संपर्क 
विभाग
प्रभाग
संपर्क अधिकारी
मोबाईल क्रमांक
नाशिक पूर्व
१४, १५, १६, २३, ३०
.महेंद्र कांबळे  
९१३००४७६२४ 
नाशिक पश्चिम
७, १२, १३
 राजेश वाघ 
९९२१८०३४४७
पंचवटी
१, २, ३, ४, ५, ६
  रविंद्र राऊत  
९८३४३९२९९३ 
नवीन नाशिक (सिडको)
२४, २५, २७, २८, २९, ३१
नदिमखान पठाण 
९८२२७४७४७०  
सातपूर
८, ९, १०, ११, २६
नारायण जाधव 
८६६८८७७६०६ 
नाशिक रोड
१७, १८, १९, २०, २१, २२
 अनंता वाघ 
९२६०१०१०४८ 

 "डेंग्यू व मलेरियाच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिकेकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.मात्र,प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात आणि परिसरात स्वच्छता राखून पाणी साचू न देणे हीच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे.प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातूनच डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल."आयुक्त मनिषा खत्री

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या