मानवी तस्करी व लैंगिक शोषणविरोधी जनजागृती कार्यशाळा संपन्न


नाशिक,दि.१५ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,नाशिक आणि विप्ला फाउंडेशन,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी तस्करी व लैंगिक शोषणविरोधी एकदिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत मानवी तस्करी व लैंगिक शोषणाबाबत जनजागृती, पीडितांचे संरक्षण,पुनर्वसन,कायदेशीर मदत आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक आणि विप्ला फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानवी तस्करी व लैंगिक शोषणाविरोधी जनजागृती कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,नाशिक चे अध्यक्ष राहुल एन.रोकडे होते.

यावेळी जिल्हा न्यायाधीश-१आर. एन.पांढरे,विप्ला फाउंडेशनच्या नंदिनी ठक्कर व तज्ज्ञांची टीम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश बी.हिवाळे,न्यायिक अधिकारी,पोलीस अधिकारी,सरकारी अभियोक्ता, विविध शासकीय विभागांचे अधिकारी,पॅरालीगल स्वयंसेवक तसेच पीडित संरक्षण व पुनर्वसनाशी संबंधित विविध हितधारक उपस्थित होते.कार्यशाळेत मानवी तस्करीतील पीडितांची ओळख, बचाव,पुनर्वसन प्रक्रिया, मानसशास्त्र सहाय्य,कायदेशीर तरतुदी, पीडित-केंद्रित कार्यपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.रोकडे,जिल्हा न्यायाधीश श्री.पांढरे,विप्ला फाउंडेशनच्या श्रीमती ठक्कर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव हिवाळे सर,आणि उपस्थित तज्ञांनी मार्गदर्शन केले.तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत पीडितांना उपलब्ध असलेल्या मोफत कायदेशीर मदत,पीडित भरपाई, समुपदेशन आणि पुनर्वसन योजनांची माहिती देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या