पिंपळगाव बसवंत - चोरट्यांनी व्यंकटेश बालाजी मंदिरातील दानपेटी फोडली; ४५ हजारांची रोकड लंपास

पिंपळगाव येथील व्यंकटेश बालाजी मंदिरातील दानपेटी फोडली; ४५ हजारांची रोकड लंपास

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
पिंपळगाव बसवंत :- येथील चिंचखेड रोडवरील महेश नगर भागात असलेल्या प्रसिद्ध श्री व्यंकटेश बालाजी मंदिरामध्ये धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दानपेटीतून अंदाजे ४५,००० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डाव साधला पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,ही चोरी २९ जूनच्या रात्री ९:३० ते ३० जूनच्या सकाळ दरम्यान घडली.चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मंदिरात प्रवेश केला आणि दानपेटीतील १०, २०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांसह अंदाजे ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. सकाळी चोरीचा हा प्रकार भाविक आणि मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पिंपळगाव 
पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी व्यावसायिक गोकुळ शंकरलाल मुंदडा,(वय ४९, रा. शिवाजी नगर, पिंपळगाव) यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कडलग,करत आहेत.पिंपळगाव पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

(जाहिरात)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या