नाशिक - अनाधिकृत नळ जोडणी केल्यास कारवाई, रस्ता क्रॉसिंग बांधकाम परवानगी आवश्यकच

नवीन नळ जोडणी (Water Connection) देण्याबाबत कार्यालयीन आदेश देण्यात आले

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :-  महानगरपालिका क्षेत्रात धरणात पुरेसा पाणी साठा असुनही लोकप्रतीनीधी व नागरीकांच्या अपुरा पाणी पुरवठा होत असल्याबाबत मोठया प्रमाणात तक्रारी वाढलेल्या आहेत.यास प्रामुख्याने चुकीच्या नळ जोडणी व पाईपलाईन लिकेजच्या तक्रारींमुळे पाणी पुरवठयात असमन्वय असल्याबाबतचे निदर्शनास आलेले आहे.नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत आणि समन्यायी पद्धतीने व्हावा,यासाठी नवीन नळ जोडणी देण्याबाबत खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.सर्व संबंधित अधिकारी,कर्मचारी आणि परवानाधारक प्लंबर यांनी याचे काटेकोरपणे पालन करावे.
1) नळ जोडणीची जागा (Tertiary Line):- नवीन नळ जोडणी ही केवळ घराच्या अगदी जवळ असलेल्या अंतर्गत वितरण वाहिनीवरून (Distribution line / Tertiary line) म्हणजेच शेवटच्या जलवाहिनीवरूनच देण्यात यावी.
2) मुख्य वाहिनीवर बंदी:- कोणत्याही परिस्थितीत मुख्य जलवाहिनी (Main Distribution Line) किंवा दुय्यम जलवाहिनीवर (Secondary Distribution Line) नवीन नळ जोडणी दिली जाऊ नये.
3) विभागाची पूर्वपरवानगी :- नळ जोडणीकरीता विहीत नमुन्यात अर्जदाराने अर्ज करणेत येऊन सक्षम प्राधिकारी यांचे पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
4) परवानाधारक प्लंबर:- प्रत्येक नळ जोडणी ही पाणी पुरवठा विभागाच्या पूर्वपरवानगीने आणि केवळ नाशिक महानगरपालिकेच्या परवानाधारक प्लंबरमार्फतच (Licensed Plumber) केली जावी. अन्य प्लंबरमार्फत नळ जोडणी करत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर विभागीय कार्यालयामार्फत गुन्हा दाखल करुन फौजदारी कारवाई करण्यात येईल.याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
5) रस्ता क्रॉसिंग :- रस्ता क्रॉसिंग करतांना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी आवश्यक आहे.विना परवाना रस्त्याची तोडफोड अथवा नुकसान केल्यास संबधित प्लंबरमार्फत रोड डॅमेज चार्जेसच्या 02 पट दंड आकारणीकरण्यात येईल व त्यावर विभागीय कार्यालयामार्फत गुन्हा दाखल करुन फौजदारी कारवाई करण्यात येईल.याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
दंडात्मक व प्रशासकीय कारवाई अलीकडच्या काळात काही ठिकाणी हेतुपरस्सर मुख्य किंवा दुय्यम जलवाहिनीवरून (Main/Secondary Line) नळ जोडणी दिली गेल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे पाणी पुरवठ्याच्या (presure) दाबावर व वितरणावर विपरीत परिणाम होत आहे.
1) अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई:- यापुढे जर कोणत्याही मुख्य किंवा दुय्यम जलवाहिनीवर बेकायदेशीर पध्दतीने नळ जोडणी दिलेली असल्याचे आढळल्यास, संबंधित कनिष्ठ अभियंता,आणि उपअभियंता यांच्यावर तात्काळ शिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल.
2) प्लंबरवर कारवाई: जर कोणत्याही परवानाधारक प्लंबरने विभागाच्या मंजुरीशिवाय किंवा नियमाबाह्य पद्धतीने अशी नळ जोडणी केल्याचे आढळल्यास, त्यांचा प्लंबिंग परवाना (License) कायमचा रद्द (Terminate) करण्यात येऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या