नाशिक महानगर पालिकेच्या वतीने एकल महिला दिवस"साजरा करण्यात येणार - उपायुक्त नितीन नेर

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय विधवा दिन"निमित्त "एकल महिला दिवस" साजरा करण्यात येणार आहे.या निमित्त मनपाच्या सहाही विभागीय कार्यालयात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांनी दिलेल्या सूचने नुसार दि.२३ जून २०२६ रोजी "आंतरराष्ट्रीय विधवा दिन निमित्त"एकल महिला दिवस" साजरा करण्याबाबत निर्देशित केलेले आहे. त्यानुसार नाशिक मनपाच्या वतीने मनपा आयुक्त मनीषा खत्री,यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, यांचे मार्गदर्शनाखाली मनपाच्या सर्व (सहा) विभागीय कार्यालयात कार्यक्रम होणार आहेत.
"विधवा"या शब्दाऐवजी "एकल महिला"ही संज्ञा वापरून शहरातील सर्व एकल महिलांना निमंत्रित करून त्यांच्या समस्या, अडचणी तसेच त्यांच्या शासनाकडून अपेक्षित उपाय योजनांबाबत चर्चा,महिलांनी उभारलेल्या यशस्वी उपक्रमांची माहिती देऊन त्यांचा सत्कार/प्रेरणादायी संवाद,मनपाच्या विविध योजनांचा लाभ एकल महिलांना मिळण्यासाठी विशेष मार्गदर्शन,रोजगार,स्वयंरोजगार व उद्यमशीलता संधींबाबत मार्गदर्शन,बचत गटामध्ये नसलेल्या महिलांना बचत गटांशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न,स्त्री-पुरुष समानता, सन्मान व सामाजिक प्रतिष्ठा याबाबत स्थानिक संस्थांमार्फत जनजागृती व एकल महिलांच्या समस्या, सूचना व मागण्या नोंदवून त्यांचे संकलन करणे,महिलांसाठी आवश्यकतेनुसार समुपदेशन व सहाय्य सुविधा उपलब्ध करणे,शहरातील एकल महिलांची नोंद, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती व प्रमुख अडचणी यांचे सर्वेक्षण/संकलन करणे,अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका,महिला बचत गट व स्थानिक यंत्रणांचा सक्रिय सहभाग याविषयी कार्यक्रम राबविले जाणार आहेत.मनपाच्या सर्व विभागीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते ६.००) होणार आहेत तरी यामध्ये नाशिक शहरातील महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मनपा समाज कल्याण उपायुक्त नितीन नेर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या