मुंबई नाका ते त्र्यंबक नाका प्रवास बदलणार! काय आहे नवा 'विकास मार्ग' प्लॅन?

मुंबई नाका ते त्र्यंबक नाका प्रवास बदलणार! काय आहे नवा 'विकास मार्ग' प्लॅन?
मुंबई नाका ते त्र्यंबक नाका होणार 'विकास मार्ग'
सिमेंट काँक्रीट रस्त्यासह भुयारी सुविधा आणि पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेची कामे प्रगतिपथावर

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला मुंबई नाका–गडकरी चौक–त्र्यंबक नाका हा मार्ग नव्या स्वरूपात विकसित होत आहे. या माध्यमातून हा मार्ग पायाभूत सुविधांनी परिपूर्ण होणार असल्याने नाशिककरांना त्याचा लाभ होणार आहे,अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. 
नाशिक पश्चिम विभागांतर्गत सुमारे १.१४० किलोमीटर लांबीच्या या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला गती देण्यात आली असून, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहर सज्जतेचा विचार करून नाशिक महापालिकेकडून विविध मूलभूत सुविधा एकत्रितपणे उभारल्या जात आहेत.
या मार्गावर भविष्यात घरगुती व व्यावसायिक वापरासाठी नैसर्गिक वायूपुरवठा (एमएनजीएल) करण्याच्या दृष्टीने सुमारे ५०० मीटर लांबीची वायूवाहिनी प्रस्तावित करण्यात आली आहे.तसेच महापालिकेची विद्यमान विद्युत यंत्रणा आणि ऑप्टिकल फायबर केबल यांची सुमारे ८०५ मीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत.

कामांची सद्यस्थिती
सुविधा / कामाचे स्वरूप
एकूण लांबी (मीटर)
स्थिती / प्रगती
नैसर्गिक वायू वाहिनी (एमएनजीएल)
५००
प्रगतिपथावर
ऑप्टिकल फायबर केबल व विद्युत सुविधा
८०५
१०० टक्के पूर्ण
पावसाळी पाणी निचरा वाहिनी
१,१४०
प्रगतिपथावर
सिमेंट काँक्रीट रस्ता
१,१४०
प्रगतिपथावर

मुंबई नाका, गडकरी चौक आणि त्र्यंबक नाका हे शहरातील प्रमुख वाहतूक केंद्र आहे.याच मार्गावरून सिंहस्थासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना सुरक्षित,जलद आणि अधिक सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार आहे.त्यामुळे महापालिका प्रशासनाने या मार्गाला सर्व पायाभूत सुविधांनी युक्त करण्यास प्राधान्य दिले आहे. 
- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका, नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या