नाशिक - बेरोजगारांना रोजगाराची संधी नाशिकला मेळाव्याचे आयोजन जागेवर निवड

“पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”अंतर्गत 30 जून रोजी “जागेवर निवड संधीचे” चे आयोजन
नाशिक :-जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक यांचेमार्फत ‍दि. 30 जून, 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर,नाशिक परिसर या ठिकाणी नोकरी इच्छुक उमेदवारांकरीता “पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”अंतर्गत “जागेवर निवड संधीचे”आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात स्पार्क एच.आर. सोल्युशन, रिक्तपदे-२५,क्वीस कॉर्प लिमिटेड, पुणे,रिक्तपदे-४०, क्लीन ऍक्टीव्ह टाईमली, नाशिक, रिक्तपदे-१०० अशा तीन पेक्षा जास्त औद्योगिक आस्थापना /कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी जिल्ह्यातील युवक/ युवतींना एकूण- १६५ पेक्षा जास्त विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे.दि. 30 जून, 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सातपूर,नाशिक परिसर या ठिकाणी उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे.तसेच,उक्त नमुद ठिकाणी उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती देऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.

भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhayay Job Fair ऑप्शनवर Click करुन “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”यावर रिक्तपदे अधिसूचित करावी व दिनांक 30 जून, 2026 रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे.याबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 0253-2993321 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा.असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,नाशिक यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या