गंदन्तेगचेनलिंग बौद्ध विहारामध्ये 'व्हेसल्स ऑफ लाईटस्' प्रदर्शित
भारत-मंगोलिया सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा गाठत,अर्हत सारीपुत्र आणि अर्हत महामोग्गाल्लाना या भगवान बुद्धांच्या मुख्य शिष्यांच्या पवित्र अवशेषांची/ अवशेषांचे बौद्ध पौर्णिमेच्या (वैशाख दिवस) निमित्ताने,एका समारंभाचे आयोजन करून मंगोलियाची राजधानी उलानबातर येथील गंदन्तेगचेनलिंग मठात प्रतिष्ठापना/जतन करण्यात आले.
भारतातून, 31 मे 2026 ते 10 जून 2026 या दहा दिवसांच्या कालावधीत भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनासाठी आणलेल्या या पवित्र अवशेषांचे हजारो भाविकांनी आणि भिक्खूंनी अत्यंत आदराने स्वागत केले.या प्रदर्शनाचे उद्घाटन आसामचे माननीय राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, मंगोलियातील भारतीय राजदूत महामहिम अतुल मल्हारी गोतसुर्वे, मंगोलियाचे वरिष्ठ अधिकारी,प्रमुख बौद्ध नेते,आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ आणि महाबोधी सोसायटी ऑफ श्रीलंका तसेच अखिल जागतिक बौद्ध जगतातून उपस्थित असलेल्या अभ्यागतांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाचे राष्ट्रपती उखनागीन खुरेलसुख यांच्या ऑक्टोबर 2025 मध्ये दिलेल्या भारत भेटीदरम्यान या प्रदर्शनाची घोषणा केली होती. भारत आणि मंगोलिया यांच्यादरम्यानच्या भगवान बुद्धांच्या शिकवणीमध्ये रुजलेल्या सखोल आध्यात्मिक आणि सांस्कृति संबंधांचे प्रतिबिंब आहे.समारंभाला संबोधित करताना आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या प्रसंगाचे वर्णन ऐतिहासिक क्षण म्हणून केले. त्यांनी सांगितले की,पवित्र अवशेष हे प्रबोधनाच्या जिवंत प्रकाशाचे प्रतीक असून ते शांतता,करुणा आणि सौहार्दाचा वैश्विक संदेश देतात.
भारत–मंगोलिया भागीदारीचा उल्लेख करताना राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,यांच्या त्या विधानाची आठवण करून दिली की,भारत आणि मंगोलिया हे शतकानुशतके बौद्ध धर्माच्या माध्यमातून जोडले गेलेले “आध्यात्मिक शेजारी”आहेत.
यावेळी गंदन्तेगचेनलिंग मठाच्या परिसरात“व्हेसेल्स ऑफ लाईट आयकॉनोग्राफी, रिलिक्स अँड पाथ ऑफ धम्मा – शाक्यमुनी बुद्धांचा भारतीय संग्रहालयांतील संग्रहांमधून प्रवास” या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले.नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय संग्रहालयाने साकारलेल्या या प्रदर्शनात भारतीय संग्रहालयांतील निवडक अमूल्य वस्तूंच्या माध्यमातून भगवान बुद्धांचे जीवन, शिकवण आणि कलात्मक प्रतिमा यांचे समृद्ध दृश्य कथन सादर करण्यात आले आहे.हे प्रदर्शन भारताच्या समृद्ध बौद्ध वारशाचे आणि आजच्या काळातील त्याच्या सातत्यपूर्ण महत्त्वाचे दर्शन घडवते.
हे पवित्र अवशेष 10 जून 2026 पर्यंत मंगोलियातील भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहेत.या प्रदर्शनाला मंगोलियातील हजारो बौद्ध अनुयायी आणि अभ्यागत भेट देतील,अशी अपेक्षा असून त्यामुळे भारत आणि मंगोलिया यांच्यातील शतकानुशतकांच्या आध्यात्मिक नात्याला अधिक बळ मिळेल.तसेच दोन्ही देशांच्या जनतेला जोडणाऱ्या सामायिक बौद्ध वारशाची पुनर्प्रतिष्ठाही होईल.
0 टिप्पण्या