मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयात नवीन पाच न्यायाधीशांची नियुक्त

नवी दिल्ली :- सर्वोच्च न्यायालयाला मिळाले पाच नवीन न्यायाधीश; महामहीम राष्ट्रपतींकडून नियुक्त्यांना मंजुरी.भारत सरकारच्या दि. 01.06.2026 रोजीच्या सम क्रमांकाच्या अधिसूचनेनुसार, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 124 च्या खंड (2) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी खालील व्यक्तींना,त्यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून,भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे.न्यायमूर्ती शील नागू,मुख्य न्यायाधीश,पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय,न्यायमूर्ती चंद्रशेखर, मुख्य न्यायाधीश,मुंबई उच्च न्यायालय,न्यायमूर्ती संजीव सचदेवा,मुख्य न्यायाधीश,मध्य प्रदेश उच्च न्यायालय,न्यायमूर्ती अरुण पल्ली,मुख्य न्यायाधीश,जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय,आणि
श्रीमती वेंकिटा सुब्रमणी मोहना, ज्येष्ठ अधिवक्त्या (वरिष्ठ वकील).

(जगन्नाथ श्रीनिवासन)
संयुक्त सचिव, भारत सरकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या