नाशिक :- लक्ष्मी नारायण मंदिर सभागृह, येथे महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी तसेच आत्मरक्षणाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल मराठा परिवार, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य कराटे प्रशिक्षण शिबिराचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.शिबिरात सहभागी झालेल्या मुलींनी आत्मरक्षणाची विविध तंत्रे आत्मसात करून उल्लेखनीय कामगिरी केली.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य महिला व बाल आयोग सदस्य डॉ.सायली पालखेडकर,प्रभाग सभापती तथा नगरसेवक ॲड.सुनील बोराडे,एसएमबीटी कॉलेजच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता मातेरे,नाशिक रोड बार असोसिएशनच्या महिला सदस्य ॲड.राजश्री बोराडे,पालीभाषा अभ्यासक रोहिणी जाधव,रुपाली देशपाडे,गौरी संतोष वैद्य, म.न.पा. केंद्रप्रमुख गोपालदास बैरागी,बार्टी समाज कल्याण विभागाच्या मंगला मोरे,तसेच सकल मराठा परिवाराचे समन्वयक खंडूभाऊ आहेर,यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी खंडू आहेर यांनी मुलींना आत्मविश्वास,स्वसंरक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत प्रत्येक मुलीने आत्मरक्षणाचे प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सकल मराठा परिवार च्या कामाविषयी माहिती दिली.शिबिरादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
सकल मराठा परिवाराने महिला सक्षमीकरणासाठी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून भविष्यातही अशाच सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.पालक, सामाजिक कार्यकर्ते,महिला वर्ग तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश बोराडे,संजय गोराडे,स्नेहल चौधरी-काळे,कल्पेश (बबलू) बोराडे, योगेश मुळाणे,अक्षय शिंदे,योगेश वरखेडे,सिंधुताई पगार,प्रवीण देशमुख,ॲड.गौरव मोहिते,धनाजी आगळे,कैलास देशमुख,स्वप्निल सोनवणे यांच्यासह सकल मराठा परिवाराच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या