चांदवड प्रतिबंधित गुटखा तंबाखू जप्त;पोलिसांची चाहूल लागताच विक्रेता फरार


चांदवड,नाशिक:- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाला गुटखा आणि तंबाखूची बेकायदेशीर साठवणूक व विक्री करणाऱ्या एका इसमावर चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांची चाहूल लागताच संशयित विक्रेता अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला असून,चांदवड पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.पोलिसांची धाड आणि मुद्देमाल जप्त.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,९ जून २०२६ रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास चांदवड येथील आदिनाथ नगर भागात ही कारवाई करण्यात आली.विजय जवाहरलाल मोरे,(वय ४२, रा.आदिनाथ नगर,चांदवड) हा आपल्या घराच्या आडोशाला मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटख्याची बेकायदा विक्री करत होता.या कारवाईत पोलिसांनी ६२० रुपये किमतीच्या विमल पान मसाल्याच्या १५ पुड्या (प्रत्येकी ४८ रुपये) आणि ४७० रुपये किमतीच्या विंग तंबाखूच्या २३५ पुड्या (प्रत्येकी २ रुपये)असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.आरोग्याशी खेळ; आरोपीवर गुन्हे दाखल.

गुटखा आणि तंबाखूच्या सेवनाने कर्करोगासारखे गंभीर आजार होऊन मृत्यू होऊ शकतो,याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा साठा केला होता.कारवाई दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने अंधाराचा व आडोशाचा फायदा घेत तिथून पळ काढला.
याप्रकरणी पोलीस शिपाई शिवनाथ विष्णू शेळके,यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजय मोरे,याच्याविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम १२३,२२३,२७४ आणि २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) बी. डी. गुळ्हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या