नाशिक :- शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता नाशिक येथील सैनिकी मुलां/मुलींच्या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल विलास सोनवणे (नि.) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
इच्छुक युद्ध विधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी,माजी सैनिक व सेवारत सैनिक व इतर नागरिकांचे जे पाल्य बारावीनंतर पुढील उच्च शिक्षणाकरीता नाशिक येथील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशित आहेत,अशा पाल्यांच्या निवास व भोजनाच्या सोयीकरीता संबंधितांनी वसतिगृहातून प्रवेश अर्ज व माहिती पत्र घ्यावे.तसेच प्रवेश पुस्तिकांची संख्या मर्यादित असल्याने सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ https://www.mahasainik.maharashtra.gov.in वरून प्रवेश अर्ज डाऊनलोड करून आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज संबंधित वसतिगृह अधीक्षक/अधीक्षिका यांच्याकडे १५ जुलै, २०२६ पर्यंत जमा करावेत.
पात्र विद्यार्थी/विद्यार्थिनींना पालकांसह वसतिगृह प्रवेशाकरीता मुलाखतीस बोलावले जाईल.जिल्ह्यातील इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांकरीता असलेल्या सैनिकी मुलां/मुलींच्या वसतिगृहाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोनवणे,यांनी केले आहे.
0 टिप्पण्या