नाशिक - पाच अनाधिकृत शाळेंची नावे जाहीर,अधिकृत शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घ्याव - डॉ मिता चौधरी

नाशिक - पाच अनाधिकृत शाळेंची नावे जाहीर,अधिकृत शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घ्याव - डॉ मिता चौधरी

नाशिक :- महानगरपालिका हद्दीतील सुरू असलेल्या अधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश घ्यावा असे आवाहन नाशिक मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी यांनी केले आहे.

नाशिक महापालिका हद्दीतील पालकांनी आपल्या पाल्यास अनाधिकृत अथवा बंद शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये अन्यथा विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला पालक जबाबदार राहतील.
महानगरपालिका हद्दीतील ५ (पाच) शाळा अनाधिकृत असून या शाळांमध्ये कुठल्याही पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये असे आवाहन मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ मिता चौधरी, यांनी केले आहे.
अनाधिकृत शाळा
१) सेंट झेवियर्स फ्रान्सिस इंग्लिश मिडीयम स्कूल, जेल रोड नाशिक.(सन २०२५-२६ मध्ये बंद करण्यात आली आहे )
२) विमलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल अंबड (सन २०२५-२६ मध्ये बंद करण्यात आली आहे )
३) बुधिष्ट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, नाशिकरोड 
४) बुधिष्ट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, पाथर्डी, नाशिक 
५) बुधिष्ट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, वडाळा,नाशिक 
डॉ. मिता चौधरी
प्रशासन अधिकारी मनपा शिक्षण विभाग नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या