नाशिक :- नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या 'क्रेडाई प्लॉट एक्स्पो २०२६' चा गोविंद नगर येथील मनोहर गार्डनमध्ये शानदार प्रारंभ झाला.क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने आयोजित हा प्रदर्शनाचा उपक्रम १३ आणि १४ जून या दोन दिवसांसाठी असून, पहिल्याच दिवशी नाशिककरांनी या एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
एकाच छताखाली ५० हून अधिक नामांकित बिल्डर्सचे प्रोजेक्ट बुकिंगसाठी,तसेच बघण्यासाठी उपलब्ध आहे.
नाशिकमध्ये स्वतःचा प्लॉट असावा, असे स्वप्न पाहणाऱ्याग्राहकांसाठी हे प्रदर्शन पर्वणीच ठरत आहे.यामध्ये नाशिकमधील ५० पेक्षा जास्त नामांकित विकासकांचे (Developers) शेकडो प्लॉट्सचे प्रकल्प मांडण्यात आले आहेत. १० लाखांपासून ते प्रीमियम बजेटपर्यंतचे विविध पर्याय येथे उपलब्ध आहेत.
सुरक्षित गुंतवणुकीचा विश्वास
"नाशिकमध्ये प्रथमच अशा प्रकारचा भव्य 'प्लॉट एक्स्पो' आयोजित करण्यात आला आहे. ग्राहकांना रेरा नोंदणीकृत आणि कायदेशीररित्या सुरक्षित असलेले प्लॉट्स एकाच ठिकाणी मिळावेत हा आमचा उद्देश आहे,"असे क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने सांगण्यात आले.नाशिकमधील वाढते औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांमुळे स्थावर मालमत्ता,जमिनीच्या गुंतवणुकीला सध्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये :
ठिकाण : मनोहर गार्डन,हॉटेल ट्रीटच्या मागे,गोविंद नगर,नाशिक.
वेळ: सकाळी १०:३० ते रात्री ८:३० पर्यंत.
विशेष सवलती: प्रदर्शनात येणाऱ्या ग्राहकांसाठी स्पॉट बुकिंग ऑफर्स आणि बँकांकडून सुलभ गृहकर्जाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परिसर: नाशिक,इगतपुरी,त्र्यंबकेश्वर, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि आडगाव यांसारख्या शहराच्या सर्व उपनगरांतील प्रोजेक्ट्सचा समावेश.
उद्या (१४ जून) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून,जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या