"नाशिककर सावधान! गर्दीचा फायदा घेत ६५ वर्षीय महिलेला लुटले; भरवस्तीत ७० हजारांची चोरी


त्र्यंबकेश्वर :- त्र्यंबकेश्वर शहरातील बस स्थानक परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी कमलबाई भास्कर दुबे,(वय ६५, रा. दोनवाडे,भगूर) या गुरुवारी (दि. ११) ५ वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर बस स्थानक परिसरात असताना ही घटना घडली.संशयित महिलेने लबाडीच्या इराद्याने कमलबाई यांच्या गळ्यातील १ तोळा वजनाचे दोन पदरी सोन्याचे पोत (मंगळसूत्र),ज्यात ७० सोन्याचे मणी होते,ते लंपास केले.या दागिन्यांची किंमत अंदाजे ७० हजार रुपये आहे.
याप्रकरणी कमलबाई दुबे,यांच्या तक्रारीवरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संशयित महिला आरोपीताविरुद्ध भादंवि कलम ३०३ (२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए.के.खैरनार,करत आहेत.धार्मिक स्थळ असल्याने भाविकांची मोठी गर्दी असते,अशा ठिकाणी प्रवाशांनी आपल्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी,असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या