नाशिक :- येवला आणि लासलगाव परिसरातील नागरिकांची झोप उडवणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली आहे.शंकर शिवाजी पवार,(वय ४५, रा. गुजरखेडा, ता. येवला) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.त्याच्याकडून चोरीचा ऐवज घेणाराही पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.याकारवाईत दोघे ताब्यात घेतले आहे.पोलीसांच्या धडक कारवाईमुळे परिसरात घडलेले घरफोडीचे ६ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.
अशी झाली कारवाई:
नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी (IPS) यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवला व लासलगाव परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला.घटनास्थळावरून मिळालेले तांत्रिक आणि भौतिक पुरावे,तसेच गुप्तहेरांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित शंकर पवार,याला ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेच्या पथकाने शंकर पवार, याला विश्वासात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता,त्याने आपल्या एका साथीदारासह घरफोडी केल्याची कबुली दिली. भाऊराव उर्फ गालफुग्या रघुनाथ पवार(रा. तासदिंडोरी,ता.निफाड, जि.नाशिक) असे त्याच्या फरार साथीदाराचे नाव आहे.या दोन्ही आरोपींतांनी मिळून येवला आणि लासलगाव परिसरात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचे समोर आले आहे.सध्या फरार सं आरोपीत 'गालफुग्या' याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. गुन्ह्यांची उकल:
सं आरोपीताने दिलेल्या कबुलीवरून खालील पोलीस ठाण्यांमधील ६ गुन्हे उघड झाले आहेत
येवला शहर पोलीस स्टेशन: ४ गुन्हे
लासलगाव पोलीस स्टेशन: २ गुन्हे
अटक करण्यात आलेला सं आरोपीत शंकर पवार,हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार,असून,यापूर्वीही त्याच्यावर येवला शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
पुढील तपास आणि पोलीस
पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी,अंमलदार आणि येवला शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.
0 टिप्पण्या