त्र्यंबकेश्वर,नाशिक :- त्र्यंबकेश्वर शहरातील एसटी महामंडळ बसस्थानक परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोराने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि मंगळसूत्र लंपास केले आहे.याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गर्दीचा फायदा घेऊन चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जिजाबाई भाऊसाहेब कटाळे,(वय ६३,रा.नाशिक) या ११ जून २०२६ रोजी दुपारी पावणेदोन ते दोन वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर शहरातील एसटी महामंडळ परिसरात बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमधील प्रचंड गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात आरोपीताने त्यांच्या गळ्यातील सोन्याची दोन पदरी पोत आणि दोन वाट्यांचे मंगळसूत्र फिर्यादीच्या संमतीशिवाय जबरदस्तीने चोरून नेले.४० हजारांचा मुद्देमाल लंपास
चोरीला गेलेल्या ११ ग्रॅम वजनाच्या या सोन्याच्या मंगळसुत्राची बाजारातील अंदाजे किंमत ४०,००० रुपये आहे.फिर्यादीने उशिरा तक्रार दिल्यामुळे हा गुन्हा काल १६ जून २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवला गेला आहे.पोलीस तपास सुरू,
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध बीएनएस अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन जाधव,करत आहेत.
0 टिप्पण्या