महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र. ७ मध्ये ‘मान्सून टास्क फोर्स’ ऍक्टिव्ह!

आज प्रभाग क्र. ७ मध्ये ‘मान्सून टास्क फोर्स’ ऍक्टिव्ह! 

नाशिक :- पावसाळी समस्यांवर तातडीची कार्यवाही म्हणून“मॉन्सून टास्क फोर्स”तैनात करण्यात आले आहे.या मोहिमीची सुरुवात महापौर हिमगौरी आहेर आडके,यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक ७ पासून करण्यात आली असून याची प्रत्यक्ष पाहणी करून महापौर हिमगौरी आहेर आडके,यांनी आढावा घेतला.पावसामुळे प्रभाग क्रमांक.७ मध्ये तुंबणारे पाणी,रस्ता आणि गटार तुंबणे,कचरा साचणे या संदर्भातील कामांचा आढावा घेऊन सूचना दिल्या.याचसोबत काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले होते त्यावर देखील कारवाई करण्यात आली.

यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,उपायुक्त सुवर्णा दखणे,पश्चिम प्रभाग सभापती सुरेश आण्णा पाटील,विभागीय अधिकारी पश्चिम चंदन घुगे,अतिक्रमण उपअभियंता बांधकाम निलेश साळी,कनिष्ठ अभियंता राकेश पवार,विभागीय स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड,राजेंद्र शिंदे,केतकी चौधरी,मनिषा शिंदे,प्रभू रघुवीर अधिकारी,त्र्यंबक खैरनार,व स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या