राजर्षी शाहू महाराज जयंती ऑलिंपिक सप्ताह निमित्त,आरंभ पब्लिक स्कूलचे चामर लेणी येथे वृक्षारोपण


(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- राजर्षी शाहू महाराज जयंती तसेच ऑलिंपिक वीकचे औचित्य साधून आरंभ पब्लिक स्कूलतर्फे चामर लेणी, म्हसरूळ येथे वृक्षारोपण व सीडबॉल उधळण हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात पार पडला.या उपक्रमानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट (Field Visit) देखील आयोजित करण्यात आली होती. निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले तसेच सीडबॉल उधळून भविष्यात अधिकाधिक वृक्षांची निर्मिती व्हावी,यासाठी योगदान दिले.लहान वयातच मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता, निसर्गाबद्दल आत्मीयता आणि निसर्गाला काहीतरी परत देण्याची भावना रुजावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

यावेळी आरंभ पब्लिक स्कूलच्या संचालिका अस्मिता चेतन मोगल यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगत प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी,असे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुचिता गीते, मंजिरी चौधरी,रसिका गायकवाड, विद्या आव्हाड आणि शारदा सूर्यवंशी यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.वृक्षारोपणासह आयोजित करण्यात आलेल्या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळाली तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अनुभवातून समजले.

आरंभ पब्लिक स्कूलतर्फे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, सामाजिक उत्तरदायित्व आणि निसर्गसंवर्धनाची जाणीव निर्माण करणारे असे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून या उपक्रमाचे पालक व नागरिकांनीही कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या