नाशिक - आयुक्त मनीषा खत्री यांनी अचानक केली नांदूर नाका ते जत्रा हॉटेल मार्गाची पाहणी!

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :-  आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील दीर्घकालीन आणि सक्षम पायाभूत सुविधा उभारणीच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेमार्फत विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर विकासकामे वेगाने सुरू आहेत.याच अनुषंगाने नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री,यांनी नांदूर नाका ते जत्रा हॉटेल (घाट परिसराकडे जाणारा प्रमुख मार्ग) या रस्त्यावर सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान रस्त्याच्या बांधकामातील महत्त्वाचे टप्पे असलेल्या सब-बेस लेयर आणि जीएसबी लेयरची तपासणी करण्यात आली.यावेळी गुणवत्ता पडताळणी करताना काही ठिकाणी जीएसबी थरावर विखरून पडलेले साहित्य आढळून आले. याची तात्काळ दखल घेत आयुक्त मनीषा खत्री,यांनी संबंधित ठेकेदारास जेसीबीच्या माध्यमातून विखरून पडलेले साहित्य त्वरित हटविण्याचे निर्देश दिले.तसेच जीएसबी थर पूर्णपणे स्वच्छ करून सर्व गुणवत्ता निकषांची खात्री झाल्यानंतरच पुढील डब्ल्यूएमएम लेयरचे काम सुरू करावे,अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
महापालिकेने स्पष्ट केले की कोणत्याही परिस्थितीत रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नाही.प्रत्येक कामामध्ये गुणवत्ता, तांत्रिक मानके आणि दीर्घकालीन टिकाऊपणा याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून प्रत्येक टप्प्यावर सातत्याने गुणवत्ता नियंत्रण केले जात आहे. हा ५.८७८ किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा मार्ग पंचवटी विभागाअंतर्गत विकसित केला जात असून सिंहस्थ काळात घाट परिसराकडे जाणाऱ्या प्रमुख संपर्क मार्गांपैकी हा एक महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावर विविध भूमिगत सुविधा कामांसह रस्त्याचे मजबुतीकरण आणि पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. या रस्त्यावर सध्या ४ प्रमुख युटिलिटी कामे हाती घेण्यात आली आहेत.त्यापैकी ओएफसी अंतर्गत ९२० मीटरचे काम पूर्ण झाले आहे, तर अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा वाहिनीचे ८७० मीटर काम पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय एमएनजीएल गॅस पाइपलाइनचे काम प्रगतीपथावर असून स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे काम देखील सध्या प्रगतीपथावर आहे.
या मार्गावरील कामांची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे :
घटक
माहिती
रस्ता
नांदूर नाका – जत्रा हॉटेल (घाट परिसर संपर्क मार्ग)
एकूण लांबी
५.८७८ कि.मी.
युटिलिटी कामे
४ प्रमुख सुविधा कामे
ओएफसी नेटवर्क
१०० टक्के पूर्ण
अमृत पाणीपुरवठा वाहिनी
१०० टक्के पूर्ण
एमएनजीएल गॅस पाइपलाइन
प्रगतीपथावर
स्टॉर्म वॉटर ड्रेनेज
प्रगतीपथावर

“नाशिक महानगरपालिका शहरातील प्रत्येक विकासकामात गुणवत्ता आणि दीर्घकालीन टिकाऊपणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे.कोणतेही काम केवळ वेळेत पूर्ण करणे हा उद्देश नसून ते सर्वोत्तम दर्जानुसार आणि भविष्यात अनेक वर्षे टिकेल अशा पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. गुणवत्तेबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही,”असे नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री,यांनी यावेळी स्पष्ट केले.महापालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व विकासकामांवर सातत्याने प्रत्यक्ष पाहणी आणि गुणवत्ता नियंत्रण सुरू असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासोबतच भविष्यातील नाशिकसाठी सक्षम आणि शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या