नाशिक - तलवारबाजीच्या स्पर्धेला उत्साहात सुरुवात


(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- कालिका देवी मंदिर संस्थान,यशवंत व्यायाम शाळा,क्रीडा संस्कृती फाउंडेशन व दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक 23  ते 30 जून ऑलिंपिक सप्ताह अंतर्गत दिनांक 28 रोजी जिल्हा तलवारबाजी अजिंक्य स्पर्धेला सुरुवात झाली.स्पर्धेची उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेती कु. शरयू पाटील, यांचे शुभहस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र थ्रो बॉल संघटनेचे सरचिटणीस राहुल वाघमारे,हे होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे,तलवारबाजी राज्य संघटनेचे सहसचिव अविनाश दुधाने, छत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंदे,व स्पर्धा समन्वयक अविनाश ढोली,हे उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी बोलताना शरयू पाटील या बोलल्या की या अशा स्पर्धेतूनच आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी होते.आपण मन लावून या संधीचं सोनं करावं कार्यक्रमाची प्रास्ताविक राजू शिंदे, यांनी केले सूत्रसंचालन राहुल पडवळ,यांनी केले.आभार प्रसाद परदेशी.यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

ईपी मुले 
प्रथम- विराल मस्के 
द्वितीय- आदित्य बनगर 
तृतीय- अर्णव बनगर व विराज गोसावी 

फॉइल मुले 
प्रथम- प्रणव डेरले 
द्वितीय- चिरायू पाटील 
तृतीय- रियांश कराड व साहिल कांदळकर 

स्टॅबर मुले 
प्रथम- परदेशी 
द्वितीय- आदित्य पाटील 
तृतीय- संकेत पाटील व कार्तिक वराडे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या