पुणे :- नवीन वीजमीटर जोडणी करून देण्याच्या मोबदल्यात १२ हजार रुपयांची लाच मागून त्यातील उर्वरित ७,५०० रुपयांची रक्कम स्वीकारताना महावितरणच्या एका वर्ग-१ च्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले रामचंद्र नारायण लोढे,(वय ४२, रा. चिंचवड,पुणे)असे ताब्यात घेण्यात आलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे.याप्रकरणी पुणे शहरातील फुरसुंगी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे एक इलेक्ट्रिकल सब-कॉन्ट्रॅक्टर असून ते महावितरणची कामे करतात त्यांनी हडपसर उपविभाग-२ अंतर्गत नवीन १२ वीजमीटर जोडणीचे काम केले होते.हे काम करून देण्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र लोढे, यांने प्रतिमीटर १,००० रुपये प्रमाणे एकूण १२,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तसेच, तक्रारदाराला मिळालेल्या अन्य एका नवीन इमारतीच्या वीज कनेक्शनच्या कामासाठी देखील ५०,००0 रुपयांची मागणी लोढे यांने केली होती.तक्रारदार यांनी या संदर्भात २ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे येथे अधिकृत तक्रार नोंदवली.या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी केली.या पडताळणी दरम्यान लोकसेवक लोढे,यांने १२,००० रुपयांच्या लाचेपैकी ४,५०० रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचे कबूल केले.आणि उर्वरित ७,५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरल्यानंतर, आज दि. ४ जून २०२६ रोजी दुपारी १३:०६ वाजताच्या सुमारास एसीबीने हडपसर येथील महावितरणच्या उपविभाग-दोन कार्यालयात सापळा रचला लोकसेवक रामचंद्र लोढे,यांनी तक्रारदाराकडून ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताच,दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.सदरची धडक कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील,अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे (सापळा अधिकारी) आणि पोलीस निरीक्षक सुहास हटकर (तपास अधिकारी) यांच्या पथकाने केली आहे.
0 टिप्पण्या